Santosh Dada Chavan

Santosh Dnyaneshwar Chavan

Santosh Dnyaneshwar Chavan

Edit Template

संतोषदादा आणि त्यांच्या सामाजिक कार्याची थोडक्यात ओळख...

संतोष दादानं बद्दल थोडस...

About Santosh Dada Chavan

0 %

दिलेला शब्द पाळणारे

0 %

गरजवंतांच्या मदतीला धाऊन येणारे

दादांची काही महत्त्वाची कार्य !

दादांची काही महत्त्वाची कार्य !

गेली पाच वर्ष दहावीतील अनुक्रमे प्रथम पाच येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शालेय बॅग (सॅग) घरी जाऊन स्वतः दादांच्या उपस्थितीत दिली जायची.परंतु 2024 मध्ये दादांच्या एक गोष्ट अशी लक्षात आली की गुणानुक्रमे पाच विद्यार्थ्यांना आपण प्रोत्साहन देतो तसं आपल्या विभागातील पंचक्रोशीतील सर्वच शाळांमध्ये सर्वच विद्यार्थ्यांना जर आपण प्रोत्साहन म्हणून दप्तर (शालेय बॅग) दिली तर सर्वांनाच प्रोत्साहन मिळेल व समानता येईल
म्हणून 2025 मध्ये दादांनी अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना 15000 स्कूल बॅग (सुमारे 50 लक्ष)चे वाटप विभागातील व विभागाबाहेरच्या देखील शाळेत स्वतः जाऊन मुलांकडे दिली.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे दादांचे निसर्गाच्या प्रती असणारा प्रेम वारंवार दिसून आलेल आहे तीर्थक्षेत्र वडजी येथील बैलगाडा घाटाच्या आवारात दादांनी शेकडो वृक्षांची लावगड आपल्या स्वखर्चातून केलेली आहे तसेच वडज धरणाच्या जवळच जुन्नर रस्त्यालगत श्री संतोष दादा यांच्या माध्यमातून तालुक्यातील प्रथम ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात आली ऑक्सिजन पार्क मध्ये जवळपास 400 हून अधिक देशी वाणाची दहा फुटावून मोठी (पिंपळ, वटवृक्ष, मोगणी जांभूळ, देवदार,बांबू, शिसम) झाडे लावण्यात आली व त्यांची निगा राखण्याकरता सिंचन व्यवस्थादेखील केली गेली आहे आणि आज रोजी ती झाडे अतिशय उत्तम व निरोगी आहेत. व ते पाहण्याकरता जिल्ह्यातून निसर्गप्रेमी येत असतात.

तीर्थक्षेत्र वडज मधील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिर हे शेकडो वर्षांपूर्वी बांधलेलं होतं आणि संपूर्ण जीर्ण अवस्थेत हे मंदिर होतं अनेक वेळा ग्रामसभा, चर्चा मंदिर बनवायचे अशा अनेक मागण्या होत होत्या संतोष दादांनी या मंदिर प्रश्नामध्ये लक्ष घातले व कसं मंदिर चांगलं व पुढील काळामध्ये टिकाऊ मजबूत होईल याकरता ग्रामस्थांशी विचार विनिमय केला व हे धाडसी पाऊल उचललं ग्रामस्थांच्या माध्यमातून दादांच्या प्रयत्नातून संपूर्ण तालुक्यात उत्तम बांधकामाचा नमुना असणार हनुमान मंदिर उभारण्यात आलं ज्या ठिकाणी आर्थिक अडचणी येतील त्या ठिकाणी दादांनी स्वनिधीतून हे काम चालू ठेवलं व मंदिर बांधकाम पूर्णत्वास नेलं आजही त्या ठिकाणी पर्यटनाला येणारे पर्यटक थांबून त्या ठिकाणी फोटो काढतात व त्या कामाचं कौतुक केल्याशिवाय राहत नाहीत.

तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी वडजकरांची जीर्ण झालेली शेकडो वर्षाची धर्मशाळा या धर्मशाळेला पूर्णपणे पाडून संतोष दादांच्या प्रयत्नातून चार मजली बांधकाम करण्यात आले व एप्रिल 2024 मध्ये लोकार्पण करून सर्व वडजकर भाविक भक्तांना प्रत्येक एकादशीला राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था आज रोजी व्यवस्थित सुरळीत चालू आहे.